बोधेगावात ‘सेल्फी विथ रोहित’चा उत्साह!….

आ. रोहित पवारांचे स्वागत; तरुणांची गर्दी

बोधेगाव :
महाराष्ट्रातील तरुणांचे आशास्थान असलेल्या आ रोहित पवार यांचा बालमटाकळी दौऱ्या दरम्यान बोधेगाव याठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी तरुणांनी मोबाईल सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
आमदार रोहित पवार यांनी मंत्री राम शिंदे याना कर्जत – जामखेड मतदारसंघात धोबीपछाड करत विकास कामांचा आलेख नागरिका समोर ठेवला. सांगितल्या प्रमाणे एक- एका वचणांची पुर्ती  मतदारसंघात करत कामे सुरु केली . कोरोना सारख्या जागतिक संकटात मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर न सोडता मदतीचा हात पुढे करत आधार दिला. या सगळ्या घडामोडीत रोहित पवारांचे तरुणांना आकर्षण वाटु लागले, बालमटाकळी येथील सदिच्छा भेटी दरम्यान त्यांचे बोधेगाव येथील तरुणांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी तरुणांच्या मनातील उत्साह आणि सेल्फी साठी होत असलेली मागणी त्यांनी पूर्ण करत तरुणांना सेल्फी घेण्याकरीता वेळ दिला. यावेळी  शेवगांव पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिज भैय्या घुले,संजय कोळगे, संतोष पावसे,   क्षितिज घुले युवा मंचचे सचिन घोरतळे, अनिल घोरतळे, सिध्दांत घोरतळे, प्रसाद पवार,आकाश दसपुते, अनिस सय्यद, एकनाथ कसाळ, सुमित दसपुते, चेतन देशमुख, राजेंद्र घोरतळे, ओम ताबे, काका पोटभरे,  योगेश शिदे , मुबारक सय्यद,  रवि गायकवाड, सौरभ खेडकर,   प्रशात घोरतळे यावेळी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here