Events : वर्षात १००१ झाडे लावण्याचा शिवसंकल्प कौतुकास्पद’

चोराखळी शिवारात डेक्कन फार्मसच्या वतीने १००१ वृक्षांची लागवड

चोराखळी, कळंब : चोराखळी शिवाराला ऐतिहासिक महत्त्व आहे. लोकमाता आणि इंदौर संस्थानच्या संस्थापिका अहिल्यादेवी होळकरांचे हे आजोळ असून त्यांनी अनेक झाडे या भागात लावली, ती आजही असून तोच वारसा आपल्याला पुढे जोपासायचा आहे. या भागात वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. डेक्कन फार्मस् ही संस्था यासाठी पुढे आली असून त्यांचा या वर्षामध्ये १००१ वृक्षलागवड करण्याचा शिवसंकल्प कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते प्रा. अर्जून जाधव यांनी व्यक्त केले.

डेक्कन फार्मस् उद्योग समुह, शिवसंकल्प फाउंडेशन व ‘एएमएस’ फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चोराखळी साखर कारखाना ते वाणेवाडी गाव’ या रस्त्यावर रविवार (ता.११)  रोजी १००१ वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी वड, पिंपळ, सिताफळ, चिंच, लिंब या देशी वृक्षांची लागव़ड करण्यात आली असून तिन्ही संस्थांचे प्रतिनिधी, गावातील शेतकरी यांनी श्रमदानातून खड्डे तयार करण्याचे काम केले. तसेच वृक्षांचे संवर्धन करण्याची संयुक्तिक जबाबदारी गावातील नागरिक व डेक्कन फार्मस् यांनी घेतली. या कार्यक्रमासाठी चोराखळीचे सरपंच खंडेराव मैंदाड, वाणेवाडीचे सरपंच विशाल पाचभाई, शिवरायांचे मावळे फाउंडेशनचे डॉ. गणेश पन्हाळे, वाणेवाडीचे ज्येष्ठ नागरिक तथा डेक्कन फार्मस् चे संचालक शंकर शेळके, डेक्कन फार्मस् चे संचालक अमोल ढवण, प्रविण शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण शेळके यांनी व्यक्त केले तर आभार सुरज ढवण यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिश पाचभाई, बाबासाहेब दिवाणे, सुदर्शन उगले, रेश्मा शेळके, अभिषेक अंभग, गणेश जाधव, प्रथमेश पाचभाई, अक्षय शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

“उद्योगांनी सामाजिक भान ठेऊन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे येऊन वृक्षलागवड आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक आहेत. डेक्कन फार्मस् या संस्थेने अगदी अल्पावधीच वृक्षलागवड, शेतकऱ्यांना पिक विमा ऑनलाइन भरण्यासाठी मोफत सुविधा, दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा व ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम असे उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे मतही प्रा. अर्जून जाधव यांनी व्यक्त केले.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here