Crime : महामार्गावर रस्ता लूट करणारी टोळी जेरबंद…

25 लाख 66 हजार मुद्देमाल जप्त

दादा सोनवणे । राष्ट्र सह्याद्री…
श्रीगोंदा: परप्रांतीय ट्रक चालकाला अडवून त्याच्या ताब्यातील ट्रकमधील 30 टन मक्याचे पोते चोरी करणाऱ्या टोळीला श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले.त्यांच्या ताब्यातून याच चोरीतील तब्बल 25 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

श्रीगोंदा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 11जुले रोजी निलेश चतरसिंग लोदी (वय 19 वर्षे रा.बधोरीया जिल्हा शिवपुरी मध्य प्रदेश) यांना 10 जुलैला रात्री दीड वाजता लोणी व्यंकनाथ येथील रेल्वे गेटच्या पुढे त्यांची ट्रक आज्ञात आरोपींनी आडवुन तीबाबुर्डी शिवारातील वस्तीजवळ घेवुन गेले. तेथे आरोपींची चौदा टायर ट्रक मध्ये फिर्यादीचे ट्रकमधील 25 टन मका बळजबरीने भरुन आरोपी निघुन गेले. या गुन्ह्याचे तपासात पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी गुन्ह्यात वापरलेल्या ट्रकचा शोध घेतला. हा काष्टी येथे मिळुन आला. त्या ट्रकमध्ये मकाचे दाने मिळुन आले.

त्यामुळे संशय बळावल्याने अधिक माहीती घेतली असता व तांत्रीक विश्लेषन केले असता सदरचा गुन्हा आर्यन शंकर कांबळे (वय 24 वर्षे रा.सांगवी ता.फलटण ता.सातारा), संजय बबन कोळपे (वय 46 वर्षे,रा बोरी ता.श्रीगोंदा), गणेश श्रीमंत गिरी (वय 25 वर्षे, रा. श्रीगोंदा कारखाना), भाऊसाहेब गंगाराम पालवे (वय 21 वर्षे रा.श्रीगोंदा कारखाना ता.श्रीगोंदा) व ईतर एकअशांनी केला असल्याचे उघड झाले. त्यावरुन त्यांना ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यात चोरलेला खालील मुद्देमाल आरोपींकडुन हस्तगत करण्यात आला.

या आरोपीकडून आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला बारा टायर ट्रक क्र- MH-16 CC 5982,आरोपींनी गुन्ह्यात चोरलेली 25 टन मका,आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली सी.डी.डीलक्स मोटार सायकल तीचा क्र MH-14Cv 5430,आरोपींनी ट्रक ड्रायव्हर यांचा चोरुन नेलेला विवो कंपनीचा मोबाईल, असा एकुण 25 लाख 66 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोसई अमित माळी, पोकॉ वैभव गांगर्डे हे अधिक तपास करीत आहे. मुख्य आरोपी आर्यन कांबळे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समजते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here