महिलेला मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

सासवड :

पुरंदर विळा लावून धमकावत असताना झालेल्या झटापटीत महिलेच्या बोटांना विळ्याने दुखापत झाली. याप्रकरणी मंगेश मारुती खवले (रा. थापेवाडी, ता. पुरंदर) याच्यावर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जखमी महिला जोत्स्ना रामदास झेंडे (वय ४१) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार शनिवारी (दि. १७) दुपारी १.३० च्या सुमारास आरोपी मंगेश खवले याने भिवडी येथे फिर्यादीच्या घरी येऊन तांदळाचे कट्टे विकत घ्यायचे असल्याचे सांगितले.

त्यामुळे फिर्यादीच्या मुलीने घराच्या पाठीमागील शेतात येऊन फिर्यादीला तांदूळ विकायचे आहे का असे विचारले असता फिर्यादी घरी आल्यावर खवले यास ५२ रुपये किलोने तांदूळ द्यायचे आहे असे सांगितले. त्यानंतर खवले याने आपल्याकडे कोंबड्या आहेत का असे विचारले म्हणून फिर्यादी महिला व खवले कोंबड्यांच्या खुराड्याजवळ गेले.

त्यावेळी काही कारण नसताना खवले याने फिर्यादी महिलेचे एका हाताने तोंड दाबून दुसऱ्या हाताने गळ्याजवळ विळा लावला.

फिर्यादीने दोन्ही हाताने विळा धरला व झालेल्या झटापटीत फिर्यादीच्या दोन्ही हातांच्या बोटांना कापल्याने फिर्यादीने आरडाओरडा केला. तेव्हा फिर्यादीची मुलगी आणि दीराची मुलगी तेथे आल्याने खवले तेथून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here