Events : सासरी जाणाऱ्या मुलीच्या हातून तीन झाडे लावून घ्यावीत

अवसरी (वार्ताहर) : आपल्या घरातील अगर कुटूंबातील मुलगी जर लग्न करून सासरी जाणार असेल तर तिच्या हातून तीन झाडे लावून घ्यावीत आणि तिच्या मागे तिची आठवण म्हणून त्याचे संगोपन करावे तसेच त्या मुलीने सासरी सुद्धा तीन झाडे माहेरची आठवण म्हणून लावावीत असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्या रेवती वाडेकर यांनी केले.

अवसरी बुद्रुक येथे लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीच्या हस्ते मुलीची आठवण म्हणून वाडेकर कुटूंबियाचे हस्ते झाडे लावण्यात आली .

अवसरी बुद्रुक ता आंबेगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्या रेवती वाडेकर आणि त्याचे कुटूंबीय अनेक वर्षांपासून रहात आहेत. भरत दत्तात्रेय वाडेकर हे अवसरी येथे राहत होते परंतु सध्या कामानिमित्त लोणावळा येथे राहत आहे. यांची मुलगी अपूर्वा भरत वाडेकर हिचे लग्न शिक्रापूर येथील शुभम विलास थिटे याचे बरोबर जमले आहे. लग्न होऊन सासरी जाणार पण तिची माहेर मध्ये आठवण राहावी म्हणून अपूर्वाच्या हस्ते नाना नानी पार्क मध्ये दोन बदाम आणि एक वडाचे झाड लावण्यात आले या प्रसंगी या वेळी जिल्हा परिषद सदस्या रेवती वाडेकर , ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर,बाळासाहेब वाडेकर, वाडेकर आणि सासवडे कुटूंबीय उपस्थित होते.
माहेरी मुलीची आठवण आणि सासरी माहेरची आठवण म्हणुन दोन्ही ठिकाणी तीन झाडे लावावीत . सुवर्ण युग सहकारी बँक चाकण शाखेचे मॅनेजर मनीष मधुकर सासवडे यांच्या संकल्पनेतून ही झाडे लावण्यात आली .माहेरी आई ,वडील ,चुलते आणि कुटूंबीय या झाडांचे संगोपन करतील तर सासरी नवरी मुलगी झाडाचे संगोपन करतील. या झाडे लावा झाडे जगवा ही सकंल्पना मागे पडत चालली होती .परंतु ग्लोबल वार्मिंग, कमी होणारा पाऊस म्हणून या संकल्पनेला चांगले स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच गेल्या सोळा सतरा महिन्यापासून करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकाना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागला आहे .त्यावेळी खऱ्या अर्थाने समाजाला ऑक्सिजनचे महत्त्व समजून आले आहे. म्हणून यापुढील काळात सर्वच नागरिकानी या भूमिकेचा अवलंब करून वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी हातभार लावावा असा संदेश या वेळी देण्यात आला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here