शैक्षणिक शुल्क कपातीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन…

भाविनिमगाव
राज्यात कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क कपात करण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेवगाव शिक्षण विभागास निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाला प्रतिसाद देत शेवगाव तालुक्यातील सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा यांची संयुक्त बैठक सोमवार रोजी गटशिक्षण अधिकारी रामनाथ कराड यांच्या उपस्थितीत रेसिडेन्शिअल हायस्कूल शेवगाव येथे पार पडली. बैठकीमध्ये शैक्षणिक शुल्क कमी करण्याबाबत मुख्य चर्चा झाली तसेच शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तके वाटप, विविध शिष्यवृत्ती योजना या विषयी बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यावर शालेय शुुुल्क कमी करण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी कराड यांनी प्रहार पदाधिकाऱ्यांना व पालकांना दिले फी बाबत पाठपुरावा करून कुठल्याही विद्यार्थ्याची फी मुळे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याची काळजी घेऊ असे सांगत शालेय पोषण आहारामध्ये तांदूळ भेसळीबाबत योग्य पाठपुरावा करू ,मोफत पाठ्यपुस्तके सर्व विद्यार्थ्यांना काटेकोरपणे वाटप करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली. शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर वेळेवर कशी जमा होईल याबाबतही नियोजन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या बैठकीला प्रहार धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त जिल्हाध्यक्ष कृष्णा सातपुते, शेतकरी तालुका अध्यक्ष संजय नाचण ,युवा अध्यक्ष कल्पेश दळे, भगवान मडके व इतर पदाधिकारी तसेच पालक वर्गातून राजू  जरे, श्रीराम चेड ,भागवत जरे, संजय धोटे, नंदू शेळके, संजय कुसाळकर, आदर्श जाधव यांच्यासह पालक उपस्थित होते. यावेळी सर्वांनी नामदार बच्चू कडू  यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी आशा बाळगली . याप्रसंगी संजय नाचण ,कृष्णा  सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  येत्या आठ दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लावून विद्यार्थी आणि पालकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करत कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहेच निदान शैक्षणिक संस्थानी पालकांना बंद काळात दिलासा द्यावा असे मत व्यक्त करून ८ वी ते १२ बारावी विद्यार्थी लसीकरण करण्यात यावे असे सुचवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here