लायन्स क्लब व वृक्ष परिवाराच्या वतीने वृक्षारोपण…

संगमनेर ( प्रतिनिधी )

 दंडकारण्य अभियानांतर्गत सोळाव्या वर्षात विविध सहकारी व सेवाभावी संस्थांनी सहभाग नोंदवला असून लायन्स क्लब सफायर व वृक्ष मित्र परिवाराच्या वतीने आज मोठ्या उत्साहात कपालेश्वर डोंगरावरून वृक्षा रोपण करण्यात आले.

खांडगाव येथील कपालेश्वर डोंगर परिसरात दंडकारण्य अभियान अंतर्गत अमृत उद्योग समूह, जयहिंद लोकचळवळ, वृक्ष मित्र परिवार व लायन्स क्लब सफायर यांच्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ.राजेंद्र मालपाणी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.डॉ.तांबे म्हणाले, लायन्स क्लब ऑफ सफायर आणि वृक्ष मित्रपरिवाराने सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. समाजाच्या सुख दुःखात काम करणाऱ्या या सेवाभावी संस्थांनी पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या दंडकारण्य अभियानात सक्रिय सहभाग घेऊन कौतुकास्पद काम केले आहे.
यावेळी कपालेश्वर डोंगर परिसरात विविध वृक्षांचे रोपण व संगोपन करण्याची जबाबदारी लायन्स क्लब सफायर आणि वृक्षमित्र परिवाराने घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here