वडकी येथील शेतकरी विजेच्या प्रतीक्षेत

सासवड (प्रतिनिधी ) : वडकी (ता.हवेली)येथील शेतकऱ्यांसाठी वीज शेतीसाठी घरगुती संदर्भात दररोज पाच ते सहा तास भारनियमन होत आहे.त्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य शिवसेना युवा नेते सागर मोडक यांनी चीफ इंजिनियर अलेगेकर व त्यांच्या कर्मचारी वर्गाला उरुळी देवाची महावितरणला सादर केले .
वडकी गावातील वेळोवेळी फोनवर तक्रार करून सुद्धा भारनियमन कमीच होत नाही .म्हणून गावठाण तळे वाडी,शिवराधानगर, बाजार मळा या भागात गेली ४ महिने पासून दिवसातून ४ ते ५ तास वीज खंडित होत आहे.वेळोवेळी महावितरणला सांगून सुद्धा त्वरित अधिकाऱ्याकडून निवारण होत नाही.त्याबद्दल वडकी गावच्या सामान्य नागरिक शेतकरी महिला व युवक वर्गासाठी सदैव तत्पर म्हणून कामकाज करताना योग्य ती दखल जर नाही घेतली तर शिवसेना युवासेना स्टॉयलावे आंदोलन उरुळी देवाची येथे महावितरण ऑफिस ला करण्यात येईल असे सागर बाळासाहेब मोडक ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच सचिन गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल मोडक दत्ता मोडक सागर सागर मोरे संदीप मोडक पैलवान विशाल मोडत यांनी प्रतिनिधीला माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here