कोरोनात मयत व्यक्तींच्या कुंटुबाचा फेर सर्वे करा…

श्रीरामपूर – कोरोना महामारीत   विधवा व निराधार झालेल्या माहीलांचे तातडीने पुनर्वस करावे या मागणी चे निवेदन एकल कोरोना महीला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य श्रीरामपूर शाखेच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले.

  कोरोना महामारीत अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत. अनेक घरातील कुटुंब प्रमुखांचे निधन झाल्याने घरातील विधवा महीलांवर अचानक मोठी जबाबदारी आली आहे. अनेक कुंटुब आर्थिक दृष्ट्या ऊध्वस्थ झाले आहे. शासनाच्या यादी मध्ये अनेकांची नावे नाहीत. लहान मुले निराधार झाली आहेत. त्या मुलांसह विधवा महीलांचे पुनर्वसन करावे. उध्वस्त कुंटुबाना आर्थिक मदत करावी व कोरोनाने मयत झालेल्या कुंटुब प्रमुखांच्या घराचा फेर सर्वे करा. या मागण्यांचे निवेदन श्रीरामपूर तहसिलदार  पाटील यांना कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीच्या विधवा पत्निच्या हस्ते देण्यात आले. यावेळी समितीचे मनिषा कोकाटे , जेष्ठ पत्रकार मिलिंदकुमार साळवे , रंजन लोखंडे , बाळासाहेब जपे , निलेश शेडगे , भुमिका बागुल , फिलीप पंडीत , चंद्रकात कोकाटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here