पालिका कर्माचाऱ्यास मारहाण …

कारवाई करा अन्यथा काम बंद आंदोलन

श्रीरामपूर : 
20 जुलै रोजी नगर पालिकेचे कामकाज सुरू असताना सकाळच्या वेळेत पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील कर्मचारी ज्ञानेश्वर चव्हाण हे, आपले कर्तव्य बजावीत असतांनाच त्याठिकाणी रमजान शाह जन्म दाखल्यातील दुरुस्ती संदर्भात आले असता. सदर दुरुस्ती कामी अर्ज द्यावा लागेल असे सांगितल्याचा राग आल्याने, तू मला अर्ज करायला सांगतोस, मी कोण आहे हे तुला माहिती नाही का ? तू पालिकेत कसा काम करतो हेच बघतो मी पण माजी नगरसेवक रमजान शाह आहे असे म्हणत, माजी नगरसेवक पती रमजान शाह यांनी, पालिका कर्मचारी ज्ञानेश्वर चव्हाण यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून, त्यांच्या कानशिलात मारल्याची घटना घडली, सदर घटनेसंदर्भात माहिती मिळताच, पालिकेच्या अधिकारी व कर्माचा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यासंदर्भात सदर इसमा विरुद्ध कठोर कारवाई करून, या पुढील काळात असे प्रकार घडू नये याकरिता, सदर घटनेचा निषेध नोंदवित, पालिकेतील अधिकारी व कर्माचा-यांनी, मुख्याधिकारी गणेश शिंदे, तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना निवेदन दिले असून. या संदर्भात कारवाई न झाल्यास पालिकेतील अधिकारी व कर्माचा-यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here