लोकसहभाग व ग्रामपंचायत निधीतीतून रस्त्याची डागडुजी…

जेजुरी प्रतिनिधी
जेजुरी मधून धालेवाडी- कोथळे या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची बऱ्याच दिवसांपासून अत्यंत दुर्दैवी अवस्था झाली होती. संबंधित रस्त्याच्या दुरुस्ती साठी पुणे जिल्हा परिषद यांच्याकडे धालेवाडी आणि कोथळे येथील नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करून देखील याची दखल जिल्हा परिषदेने अद्याप घेतली नाही. धालेवाडी, कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, पिसर्वे, हंबीरबेंद या सर्व गावच्या नागरिकांना याच रस्त्याने जेजुरी बाजारपेठेला येण्या-जाण्यासाठी वाहतूक करावी लागत असते. परंतु रस्त्यावर पडलेले मोठ-मोठे खड्ड्यामधून वाट काढत पुढे जाणे जिकीरीचे ठरत होते. पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच साईडपट्टी पूर्ण पणे खचल्यामुळे रस्त्याची उंची जमिनीपेक्षा अधिक जास्त होऊन अपघाताचे प्रमाण खूपच वाढले होते. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्डयात पावसाचे पाणी साठल्याने पाण्याचा अंदाज येेत नसे त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत होते.
या सर्व गोष्टीची दखल घेऊन आणि विचार करून धालेवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत निधी व लोकसहभागातून २० जुलै रोजी या रस्त्याचे मुरूम टाकून खड्डे भरून घेण्याचे काम करण्यात आले.तसेच रस्त्याच्या कडेला असणारी काटेरी झाडे हटविण्याचे देखील काम करण्यात आले.
 यावेळी उपस्थित जेजुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप भैय्या बारभाई तसेच धालेवाडी गावचे सरपंच शरद काळाणे, उपसरपंच रोहिदास गायकवाड, चेअरमन हनुमंत काळाणे, सदस्य प्रभाकर भालेराव, वंदना काळाणे ,शशिकला साबळे, लक्ष्मीबाई कदम, अंकिता काळाणे, मानवाधिकारचे सचिव कैलास काळाने, कोथळे चे माजी सरपंच वंदना जगताप, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर काळाणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here