पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन काळाची गरज

शेवगाव :
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन बीजे मुरदारे कन्स्ट्रक्शनचे संचालक बाळासाहेब मुरदारे यांनी केले.
शेवगाव शहरातील दादाजी वैशंपायन वृध्दाश्रम परिसरात रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी, नगर – नाशिक कट्टा ग्रूप, उर्जा फाऊंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने विविध फळझाडांचे वृक्षारोपण बाळासाहेब मुरदारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
 या वेळी आंबा,  नारळ, बोर, अंजिर, सिताफळ आदी सुमारे पन्नास फळझाडांच्या रोपांचे वृक्षारोपण करून त्यांना ट्री गार्ड बसवण्यात आले. मुरदारे म्हणाले की,  कोरोना संकट काळात रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारला लोकसहभागातून ऑक्सिजनचे प्लॅंट उभारावे लागले. अद्याप कोरोनाचे संकट संपलेले नाही.  झाडे मुबलक ऑक्सिजन व फळेही देतात. पर्यावरणातील सर्व प्राणीमात्रांसह मानवासाठी वृक्षांचे अनन्यसाधारण महत्व आहे.
या वेळी नगर – नाशिक कट्टा ग्रुपचे वसंत देवधर, माजी प्राचार्य दिलीप फलके, दीपक तागड, रोटरीचे माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा, रोटरीचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने, सचिव बाळासाहेब चौधरी, भागनाथ काटे,  वल्लभ लोहीया,  उर्जा फाऊंडेशनचे दीपक तागड, ओमकार भाडाईत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here