गुरुकुल विद्यालयाची विद्यार्थिनी दुर्गाडे प्रज्ञा पांडुरंग 97 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

सासवड ( प्रतिनिधी) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित गुरुकुल विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा 100% टक्के निकाल लागला असून दुर्गाडे प्रज्ञा पांडुरंग 97 टक्के गुण मिळवून प्रथम पिलाने तनुजा दत्तात्रय 96:80 टक्के गुण मिळवून द्वितीय कदम समृद्धी दत्तात्रय 95:60 टक्के मिळवून तृतिय क्रमांक मिळवला आहे.

विद्यालयातून 92 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते सन 2021 माध्यमिक शालांत इयत्ता दहावी परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयात यातील मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इयत्ता नववी चा अंतिम निकाल इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इयत्ता दहावी चे अंतिम तोंडी प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन इत्यादीच्या आधारे माध्यमिक शाळा मार्फत विद्यार्थ्यांना विषय निहाय गुणदान करण्यात आले आहे.

विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कुमार हाके तसेच मार्गदर्शन करणारे शिक्षक विद्या कारंडे पायल जगताप सविता कांबळे रमेश भोई तनुजा झुरुंगे पुनम गाडेकर श्वेता कामथे महानंदा शिरसले मंदा पानसरे शर्मिला काकडे संगीता मोरे चैताली चव्हाण या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापक विजय कुमार हाके व सर्व शिक्षकांचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या अध्यक्ष आनंदी काकी जगताप सचिव आमदार संजय जी जगताप संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक सनदी अधिकारी डॉ राजेंद्र जगताप उपाध्यक्ष संजय जाळीद्रे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ एम एस जाधव सहसचिव दत्तात्रय गवळी व्यवस्थापक कानिफनाथ अमराळे यांनी अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here