Public issue : पेरणे ग्रामस्थांचा पाण्यासाठीहंडा मोर्चाचा इशारा

वाघोली (प्रतिनिधी) : पेरणेगाव तसेच पेरणेफाटा परिसरात (ता. हवेली) गेला पंधरवडाभर पाणी पुरवठा बंद असल्याने ग्रामस्थ व महिलावर्ग त्रस्त झाले आहेत. पाणी पुरवठा त्वरीत सुरळीत न झाल्यास महिलांसह ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा माजी प्रभारी सरपंच निलेश वाळके यांनी दिला आहे.

याबाबत सांगताना निलेश वाळके म्हणाले, बंद असलेला वीजपुरवठा तसेच पाईपलाईनच्या कामांमुळे पेरणेगाव तसेच पेरणेफाटा परिसरात गेला पंधरवडाभर पाणी पुरवठा बंद पडला आहे. पाण्याअभावी ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून ग्रामस्थांना रोजच टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रोजच अनावश्यक भुर्दंड सहन करावा लागत असून रोजचा खर्च वाढत आहे. ही बाब गांधीर्याने घेत ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा त्वरीत सुरळीत न केल्यास हंडा मोर्चा काढण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असाही इशारा निलेश वाळके यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here