Public issue : पथदिवे सुरू करण्यासाठी वाघोलीत मनसेच्यावतीने मोर्चा

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोलीतील पथदिवे सुरू न केल्याने पुणे महानगर पालिकेच्या निषेधार्थ वाघोली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवार (ता.२१) रोजी सायंकाळी 4 वाजता केसनंद फाटा चौक येथे मोर्चा काढण्यात आला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, सरचिटणीस ॲड किशोर शिंदे, शहराध्यक्ष वसंत मोरे, शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली मध्ये मनसेचा पुणे महानगरपालिकेच्या निषेधार्थ जाहीर मोर्चा काढला होता.

नुकतीच वाघोली ग्रामपंचायत पुणे महानगरपालिकेकडे वर्ग झालेली आहे अशातच सार्वजनिक रस्त्यांवरील पथदिव्यांची सुमारे दीड कोटी रुपयांची महावितरणची थकबाकी असल्यामुळे पथदिव्यांचा वीज पुरवठा महावितरण कडून खंडित करण्यात आलेला आहे त्यामुळे रात्री सर्व रस्त्यांवर तसेच महामार्गावर अंधकार पसरला असून यामुळे नोकरदार महिला मुले व नागरिकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावरून वहिवाट करणे जिकरीचे झाले आहे.

विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे महानगरपालिकेने थकित वीज बिल भरण्याची घोषणा फक्त कागदावरच केली आहे. परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. यासंदर्भात वाघोली मनसेच्यावतीने पुणे महानगरपालिकेचे अधीक्षक यांनादेखील 14 जुलै रोजी लेखी पत्र दिले होते. तरीदेखील अद्याप प्रश्न मार्गी लागला नसल्याने मोर्चा काढला होता.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य विधी उपाध्यक्ष अॅड गणेश म्हस्के पाटील, हवेली तालुका विभाग अध्यक्ष प्रकाश जमधडे,संघटक काकासाहेब गायकवाड, अनिकेत मुळीक, दत्ताभाऊ व्यवहारे, सुनिलभाऊ विटकर, हितेश बोराडे, मंगेश सातव, संकेत जाधवराव, रुतिक आव्हाळे, अॕड. नरेंद्र वाघमारे, सनी रनपिसे, आनंद राजिवाडे, अजय पालवे, रोशन नवले व कार्येकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here