About Us

दैनिक राष्ट्र सह्याद्री

Beyond News advertisement करण नवले, संपादक …………………… बातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माध्यमांच्या गर्दीत नवीन दैनिकाची गरज काय? वर्तमानपत्र तशी खूप आहेत. आता तर नव्या माध्यमांच्या (इंटरनेटवर आधारित) जगात वर्तमानपत्रांची गरज काय? यावर देखील चर्चा होते. वास्तविक पाहता व्यावसायिक स्पर्धेत अडकलेली वर्तमानपत्र शहरी व ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असा सामान्य समज असल्याने समाज वर्तमानपत्रांपासून दुरावत चालला आहे. दुसरीकडे आधुनिक माध्यमांकडून चंगळवादाला प्रोत्साहन मिळत असल्याने समाज भरकटण्याची भीती आहे. अशा स्थितीत जुन्या-नव्या माध्यमांचा मेळ घालून नीतिमूल्य जपणारं तसेच शहरी व ग्रामीण भागातील सर्व घटकांचं, सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणारं एखादं माध्यम असावं, असं वाटलं म्हणून हा पत्रप्रपंच! राष्ट्र सह्याद्री ची उद्दिष्ट राष्ट्रीयत्वाची भावना जोपासताना समानतेचा पुरस्कार करणे, शहरी व ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व शाश्वत विकास साधणे, हे दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाचे मूळ उद्दिष्ट आहे. त्यासाठी विकासाच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या अशा पाच घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार व उद्योग विकास ही ग्रामीण विकासाची पंचसूत्री आहे. चालू घडामोडीबरोबरच माहिती मनोरंजन आपल्यापर्यंत पोहोचविताना राष्ट्र सह्याद्री समूहाच्या माध्यमातून या पाच घटकांना विशेष प्राधान्य देण्यात येईल. विशेष म्हणजे राष्ट्र सह्याद्रीत जाहीरात देणार्‍या व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्नही करण्यात येणार आहे. सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून विविध समाजघटकांशी एकरूप होण्याचा आमचा मानस आहे. स्वरूप समाजातील सर्व वयोगटातील व आर्थिक स्तरांतील घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी दैनिक राष्ट्र सह्याद्री वर्तमानपत्राबरोबरच वेबसाईट, मोबाईल ॲप, युट्युब चॅनेल, फेसबुक पेज, ट्विटर, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आदी नव्या जगाच्या माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत येईल. सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेल्या या विकास यात्रेत आपणही सहभागी व्हावं, हेच आवाहन..!

LATEST POSTS

Crime : मजुरासह दोघांना लोखंडी रॉडने जबर मारहाण

दोघे जण गंभीर जखमी; आरोपी फरार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल औरंगाबाद : मोलमजुरी करून घरी...