कथित तोतया पोलिसांनी 15 लाख लांबविले....
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातून जाणाऱ्या दौंड-नगर रोडवरती टोलनाक्यानजीक एका गाडीमध्ये 15 लाख रुपयाची कॅश घेऊन ती बदलण्यासाठी जात असताना अचानक खाकी वर्दीतील पोलिसांनी अडवून 15 लाख रुपये आणि एक व्यक्ती घेऊन जातो, असे सांगून घेऊन गेले. मात्र त्याचा अद्यापही लागत नसल्याने संबंधितांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.
सोलापूर जिल्ह्यातून नगरच्या दिशेने दौंड वरून नगर कडे जाणाऱ्या एका चार चाकी गाडीमध्ये 15 लाख रुपयांची रोकड घेऊन तिचे 55 लाख रुपयाचे नकली नोटा घेण्यासाठी चाललेल्या लोकांना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी टोलनाक्या नजीक इकोस्पोर्ट गाडीमध्ये आलेल्या वर्दी मधील दोन पोलिसांनी अडवले. त्यांना दमदाटी करत त्यांच्याकडील रोख पंधरा लाख रुपयाची रक्कम व त्यांचा एक व्यक्ती घेऊन याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला या असे सांगितले. 15 लाख रुपये घेऊन त्यांचा एक व्यक्ती सोबत घेऊन ते निघून गेले आहेत. मात्र या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यासह इतर ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता ते कुठेही मिळून येत नाहीत. त्यामुळे संबंधित ठिकाणी अडवून अशा प्रकारचे काही स्कॅम झालेत का? याबाबत नातेवाईकांकडून माहिती घेण्यातचे काम सुरू केले आहे.
आलेले पोलीस त्यामध्ये सावंत नावाचा एक पोलीस असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र याबाबत सखोल चौकशी केली असता सावंत नावाचा कोणताही पोलीस श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत नाही. त्यामुळे ही घटना होती की फसवणुकीचा प्रकार होता हे मात्र समजू शकले नाही तर त्यातील एकाने आमच्या हा प्रकार घडून आणल्याचे सांगितले जात होते मात्र याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही.
0 टिप्पण्या