Breaking News

तो बॅनर पोलिसांनी लगेच हटवला


बारामती

तालुक्यातील सांगवी येथील चांदणी चौकात वाळू व्यवसायिक संतोष जगतापच्या बॅनर लाऊन त्याला  भावपूर्ण श्रध्दांजली देणारा अनधिकृत बॅनर सांगवी येथे झळकल्याने खळबळ उडाली .दरम्यान याची खबर माळेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना माहिती कळताच सांगवी येथे यांनी लगेचच धाव घेत गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण रोखण्याच्या हेतूने बॅनरबाजी हटविण्याच्या सूचना देऊन बॅनर काढून टाकण्यात आला. 

संतोष जगताप हा २०११ साली वाळू व्यवसायातून झालेल्या राहू हत्याकांड मधील मुख्य आरोपी होता. अशा बॅनरबाजीमुळे तरुण मुलांच्यात गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल होत असते. याचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना माहिती मिळाल्याने बॅनरबाजीचा फ्लेक्स तात्काळ  उतरविण्यात आला. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांना बोलावून घेऊन यापुढे अनधिकृत बॅनरबाजी हटवून परवानगी शिवाय बॅनर न लावण्याच्या सूचना देखील पोलीसांनी दिल्या आहेत.


No comments