ईश्वरी कौलाने सुधीर नवले श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती
मुरकुटे गटाचा सभात्यात; उपसभापतीपदी अभिषेक खंडागळे बिनविरोध
श्रीरामपूर : श्रीरामपूर मध्ये बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष करण सासणे यांच्या गटाने एकहाती सत्ता मिळवली. मात्र तिघांची ही युती सभापती निवडीपर्यंत टिकली नाही. उपसभापती विखे गटाचे अभिषेक खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र सभापती पदावर तिन्ही गटाचे एकमत झाले नाही.
निवड प्रक्रियेत मुरकुटे गटाने सभात्याग करत तटस्थ भूमिका घेतली. सभागृहात उपस्थित संचालकांचे मतदान घेण्यात आले. ससाने गटाकडून सुधीर नवले तर विखे गटाकडून गिरीधर आसने सभापती पदासाठी उमेदवार होते. दोघांनाही समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सुधीर नवले यांना ईश्वरी कौल मिळाल्याने सभापतीपदी त्यांची निवड झाली.
सभापती निवडीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला अपयश आले. विजयाचे पक्के गणित बांधले असताना एक संचालक कोण फुटला? यावर निवडीनंतर खल सुरू झाला.
सभापती आणि उपसभापती दोन्ही पदे बेलापूर गावाला मिळाली. मात्र दोघेही एकमेकांच्या विरोधी राजकीय गटातील असल्याने बेलापुरातील संघर्ष आता श्रीरामपूर बाजार समितीत असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
0 टिप्पण्या