श्रीरामपूर : सासुरवाडीला हॉटेलमध्ये कुटुंबासह जेवण करून घरी परतताना ट्रकखालीच चीरडून जावयाचा मृत्यू झाला. येथील सय्यद बाबा दर्गा चौकात रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. अनुपम सोनी असे मृत तरुणाचे नाव असून ते पोलीस हवालदार अशोक गायकवाड यांचे जावई तर शिर्डी येथे कार्यरत ट्रॅफिक पोलीस सुरज गायकवाड यांचे मेहुणे होत.
गायकवाड कुटुंबीय चितळी येथे राहतात. अशोक गायकवाड यांची मोठी मुलगी पतीसह पुण्यात राहते. दोघेही आयटी क्षेत्रात नोकरीस आहेत. सुट्टीनिमित्त ते गावी आले होते. आज सायंकाळी सहकुटुंब हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर घराकडे चितळी येथे परतत असताना अशोक गायकवाड व त्यांचे जावई सोनी एका कारमध्ये होते. सय्यद बाबा दर्गा चौकात जावई सोनी पान घेण्यासाठी खाली उतरले. पान घेऊन गाडीकडे परतत असताना भरधाव टॅंकरने त्यांना चिडले. त्या टँकरने गायकवाड यांच्या कारलाही डॅश मारला.
क्षणार्धात झालेल्या या अपघातामुळे स्वतः पोलीस असलेले अशोक गायकवाड भांबावून गेले. रस्त्याकडे पाहताच त्यांना अपघातात चिरडले गेलेले जावई दिसले. मुलगा सुरज व इतर कुटुंबीय दुसऱ्या कारमध्ये पुढे गेले होते. त्यांना अपघाताची माहिती समजल्यानंतर ते तातडीने मागे फिरले.
या अपघातानंतर मन हेलावून टाकणाऱ्या आक्रोशाने सय्यद बाबा दर्गा चौक हळहळला.
1 Comments
This comment has been removed by the author.
ReplyDelete