संगमनेरच्या जावयाचा शिर्डी जवळील सासुरवाडीवर हल्ला..


पत्नी, मेव्हणा, आजी सासूची हत्या.... सासू, सासरे, मेहुणी गंभीरशिर्डी : कौटुंबिक वादातून एका जावयाने सासुरवाडीत घुसून पत्नी मेव्हणा आणि आजी सासूची धारदार शस्त्राने हत्या केली. त्याच्या हल्ल्यामध्ये सासू-सासरे आणि मेहुणी देखील गंभीर जखमी झाली आहे. शिर्डीजवळील सावळीविहीर गावामध्ये बुधवारी (दि 20) रात्री 11 वाजता ही धक्कादायक घटना घडली. हत्याकांडाच्या काही तासातच पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली.सुरेश उर्फ बाळू विलास निकम आणि रोशन कैलास निकम अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना नाशिक येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक मिटके यांनी दिली. 


जखमींवर सध्या शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडलं असल्याचं समोर येत आहे. आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. 


घटनेत वर्षा सुरेश निकम, (आरोपीची पत्नी वय वर्षे 24), रोहित चांगदेव गायकवाड (आरोपीचा मेहुणा) वय वर्षे, 25, हिराबाई द्रौपद गायकवाड (आरोपीची आजे सासू) वय वर्षे 70 यांचा मृत्यू झाला आहे. तर, चांगदेव द्रोपद गायकवाड( आरोपीचे सासरे) वय वर्षे 55, संगीता चांगदेव गायकवाड (सासू) वय वर्षे 45 आणि योगिता महेंद्र जाधव (मेहुणी) वय वर्षे 30 हे गंभीर जखमी झाले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या