Breaking News: शेवगावात दंगल... दगडफेकीत अनेक रक्तभंबाळ..!

 दुकाने, दुचाकी, चारचाकी गाड्या फोडल्या...छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीत दोन गट एकमेकांना भिडले


सुरेश पाटील l राष्ट्र सह्याद्री


 शेवगाव : 

शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. दगडफेकीनंतर दोन गट एकमेकांना भिडले. काही वेळातच दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाले. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.महात्मा सार्वजनिक वाचनालय, शिवाजी चौकापासून बाजारपेठेत दगडांचा मारा करण्यात आला. यात कित्येक वाहनांचे नुकसान झाले. दुकानांच्या दर्शनी भागाच्या काचा फुटल्या. चार चाकी वाहनांची ही तोडफोड करण्यात आली. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी करीत प्रचंड दगडफेक केली. पोलिसांनी जमाव पांगवल्यानंतर रस्त्यावर दगड, चपला आणि फोडलेल्या गाड्यांच्या काचांचा खच पडला होता. 

ही सर्व दंगल सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली असून फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. शहरातील नागरिकांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने लाऊड स्पीकरद्वारे करण्यात आले.
 दगडफेक आणि मारहाणीत जखमी झालेल्या अनेकांना विविध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री उशिरा अतिरिक्त फौजफाटा शहरात मागविण्यात आला होता. पोलिसांची वेगवेगळी पथके करून आरोपींची धरपकड सुरू केली होती.

पहा दंगलीचे व्हिडिओ : 


जमाव पांगवताना पोलीस : 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या