रुग्ण आणि नातेवाईकांच्या आक्रोशाने परिसर हादरला
नगर: येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग 25 रुग्ण भाजून जखमी झाले आहेत. त्यापैकी सात जण अत्यंत गंभीर असून सर्वच रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या वार्डात हलविण्यात आले. गंभीर रुग्णांना बघून त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. रुग्ण आणि नातेवाईकांच्या आक्रोशाने परिसर हादरून गेला.
आयसीयू कक्षामध्ये 25 जणांवर कॅरोनाचे उपचार सुरू होते. सकाळी आग लागल्याने हे सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यामध्ये सात जण सात जण अत्यंत गंभीर असून राहिलेल्या रुग्णांना तातडीने इतर कक्षांमध्ये हलवण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन देण्याची कार्यवाही तातडीने सुरू झाली.
दरम्यान हे उपचार घेणारे रुग्ण अत्यंत गंभीर असून त्यातील काही जणांचा मृत्यू झाल्याचे ही प्रत्यक्षदर्शीने सांगितले. परंतु याबाबत जिल्हा रुग्णालयात या अधिकृत सूत्रांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
0 टिप्पण्या