कबूतर चोरीतून अमानुष मारहाण केल्याचे हरेगाव प्रकरण
पुणे : कबूतर चोरीच्या संशयातून चार तरुणांना माणूस मारहाण केल्याप्रकरणी सामाजिक असंतोष दिसू लागताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्री फिरवत मुख्य आरोपी युवराज नानासाहेब गलांडे व मनोज वसंतराव बोडके यांना पुण्यातून अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे आणि पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
गुन्हा दाखल होताच आरोपी गलांडे व बोडखे यांनी मोबाईल बंद करून पसार झाले होते. मोबाईल बंद झाल्यामुळे पोलिसांना आरोपींचा शोध घेणे अवघड होते. दुसरीकडे रिपब्लिकन संघटनांचा दबाव वाढत होता. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातले. सामाजिक संवेदनशील प्रकरण असल्याने आरोपींना तातडीने अटक करणे गरजेचे होते.
त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या मागावर होते. पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस नाईक मनोज गोसावी, विजयकुमार वेठेकर, बापूसाहेब फोलाने, दत्तात्रय हिंगडे, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, सागर ससाणे, संदीप दरांडले, भीमराव खार्से, रवींद्र घुंगासे, चालक संभाजी कोतकर, अरुण मोरे यांच्या पथकाने युवराज गलांडे व मनोज बोडके यांना पुण्यातून सीताफिने अटक केली.
0 टिप्पण्या