Burning Truck: कापसाच्या ट्रकला आग, 51 लाखाचे नुकसान

 

नगर-दौंड महामार्गावर वेगवान प्रवास ठरतोय घातक



प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौंड या महामार्गावर काष्टीपासून तीन कि.मी. अंतरावर सांगवी फाटा येथे बारामती कडून अहमदाबाद येथे कापूस घेऊन चाललेल्या ट्रकला मध्यरात्री अचानक आग लागून या आगीमध्ये ट्रकसह संपूर्ण कापूस जळून खाक झाल्याने सुमारे 51 लाखांचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी दि. 24 रोजी बारामती येथील जी.टी.एन. कंपनीचा कापूस श्रीनाथ ट्रान्सपोर्ट मार्फत सागर भोसले यांच्या मालकीचा ट्रक एम.एच.42 बी.एफ. 0099 मध्ये सुमारे (16) सोळा टन कापूस घेऊन रात्री नऊ वाजता बारामती एमआयडीसी मार्गे भिगवण येथून निघाला असता कुरकुंब दौंड येथून नगरच्या दिशेने येत असताना दि .25 रोजी मध्यरात्री दिडच्या सुमारास चालत्या गाडीमध्ये चालक विठ्ठल भवर यांना ट्रकला पाठीमागे आग लागल्याचे गाडीच्या आरशामध्ये दिसले. त्याचवेळी अदिक वेळ न घालविता प्रसंगधाव राखून सांगवी फाटा येथे शांताई मंगल कार्यालयासमोर गाडी रस्त्याच्या कडेला थांबविली तेव्हा चालक विठ्ठल भवर व किंन्नर विशाल भवर दोघांनी गाडीतून खाली उतरले तेव्हा मागे संपूर्ण ट्रकला भिषण आग लागल्याचे दिसले.

मदतीसाठी प्रयत्न केला, अनेकांना फोन लावले; परंतु वेळ मध्यरात्रीची असल्यामुळे आग विझविण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. तोपर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला होता. यामध्ये बारामती येथील जी.टी.एन. कंपनीचा सुमारे 16 टन कापूस हा श्रीनाथ ट्रान्सपोर्ट मार्फत अहमदाबाद येथील कापड मिल मध्ये घेऊन चालला होता. आतांच्या बाजार भावाप्रमाणे कापसाचे किंमत 16 लाख रुपये तर चौदा टायर नवीन गाडीची किंमत 35 लाख असल्याने सुमारे 51 लाख रुपयाचे मोठे नुकसान झाले आहे. पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या