श्रीगोंदा - शिरूर रोडची दुरवस्था

दुरुस्तीची मागणी


श्रीगोंदा प्रतिनिधी

श्रीगोंदा -बेलवंडी - शिरूर रस्त्याची अतिशय दैयनिय स्थिती होऊन अनेक अपघात घडत आहे.  सध्या पावसामुळे रसत्याची चाळण झाली आहे. रसत्यात खडडा की खड्यात रस्ता , असा प्रश्न निर्माण झाला असुन अनेक दुचाकीस्वार ' गाडीवरून पडून इजा व जखमी झाल्याच्या घटना रोज घडत आहे . अनेक ठिकाणी गुडघ्या एवढाले खडडे पडले आहेत .अनेक ठिकाणी रस्ताच खचला आहे. पावसाच्या पाण्यामुळे खडडे तुडूंब भरले गेल्यामुळे रस्त्याचा व खड्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

असे असताना संबधित खात्याकडून कुठल्याही प्रकारचे खड्डे बुजविण्याचे कामाकडे दुर्लक्ष होत  असल्याचे  परिसरातील नागरिकां मधुन नाराजी व्यक्त होत आहे. या रसत्याने जीव घेतल्यावर प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल नागरिकांमधुन विचारला जात आहे. 

हा रस्ता नगर पुणे महामार्ग  रसत्याला जोडणारा प्रमुख रस्ता असल्यामुळे व येळपणे गटातील बहुतांशी गावांचा शिरूर येथे दळणवळण सुरु असते . रांजणगाव एम आय डी.सी मध्ये नोकरी निमित जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ जास्त असते . रात्री अपरात्री जावे लागत आहे. त्यात रस्त्यात अनेक खडडे असल्यामुळे त्यांनाही अडचण निर्माण झाली आहे. अपघाता मध्ये सुद्धा वाढ झाली आहे. शेतकर्यांना भाजीपाला घेऊन शिरूर येथे घेऊन जाण्यासही व्यत्य येत आहे .तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर खड्डे बुजवून परिसरातील नागरिकांची अडचण दूर करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. .

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  २३ ऑगस्ट २१ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या डागडुजी बाबत निवेदन देऊन ९ सप्टेंबर २१ रोजीआंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. संबधित पत्राची दखल घेत पाऊस उघडल्यानंतर संबधित ठेकेदारास सुचना देऊन रस्त्याची डागडुजी खडी व डांबर टाकून खडडे बुजविले जातील. तुम्ही आंदोलन स्थगित करून सहकार्य करावे असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या