ड्रायव्हरची एसटीला गळफास घेऊन आत्महत्या....!


शेवगाव प्रतिनिधी 

शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारात एसटी ड्रायव्हर म्हणून कार्यरत असणारे दिलीप हरिभाऊ काकडे यांनी एसटीच्या मागील बाजूस असलेल्या शीडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण, महागाई भत्ता वाढ, आणि घरभाडे भत्ता वाढ आदी मागण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू झाल्या नंतर राज्य शासनाने यातील काही मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे झालेले असतानाच आज शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे या एसटी कर्मचाऱ्याने एसटीच्या मागील बाजूस असलेल्या शीडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दिलीप हरिभाऊ काकडे हे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सदस्य आहे. त्यांचे वय 56  आहे. पंरतु अद्यापही आत्महत्या कारण स्पष्ट झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या जवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नसल्याचे समजते.

राज्यातील  विविध एसटी महामंडळाच्या संघटनेची मुख्य मागणी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी आहे, ही मागणी सध्या मान्य करण्यात आलेली नाही. मात्र महागाई भत्यात 28 वाढ, घरभाडे भत्ता यामध्ये शासनाने वाढ केली असून यामुळे राज्य सरकारवर 30 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या