आरोग्य विभागाच्या परीक्षा गोंधळा विरोधात भाजपचे आंदोलन


पुणे

आज दुसऱ्यांदा होत असलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ पहायला मिळाला आहे. पुण्यात 123 केंद्रावर होत असलेली परीक्षेत 13 ते 14 केंद्रावर अधिकारी वर्गच पोहचले नसल्याने 10 वाजता सुरू होणारी परीक्षा साडेअकरा वाजता देखील सुरू झाली नव्हती. पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ पहायला मिळाला.आरोग्य विभागाच्या या गोंधळाविरोधात भाजपच्यावतीने परीक्षा केंद्राबाहेर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व आरोग्य विभागातील परीक्षा देणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनाच्या वेळी आरोग्य  विभागाच्या परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला म्हणून राज्य सरकारच्या  निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला.

जगदीश मुळीक म्हणाले, आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य विभागातहि एखाद्या सचिन वाझेला वसुली साठी ठेवलं कि काय असा सवाल यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे.

ज्या न्यासा कम्युनिकेशनला या परीक्षेच काँट्रॅक देण्यात आलं ती कंपनी उत्तर प्रदेशात ब्लॅक लिस्टमध्ये आहे.अशी माहिती मिळत आहे.असं असताना देखील या कंपनीला काँट्रॅक देण्यात आलं आहे.राज्य सरकार या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहे.अशी टिका देखील यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या