ऊर्जामंत्र्यांच्या मनमानीची थेट सीएमकडे तक्रार!


मुंबई 

राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात वीज कामगार महासंघाने मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र व्हायरल झाले आहेत. या पत्रामध्ये राऊत यांची चुकीची धोरणे आणि कथीत वसुलीबाबतचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचवण्यात आला आहे.

राज्याचे उर्जामंत्री यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर निशाणा साधला. राज्यामध्ये कोळश्याची टंचाई निर्माण सांगत असताना त्यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कोल इंडियाच देशातील वीज प्रकल्पांतील कोळसाटंचाईला आणि पर्यायाने वीजटंचाईला जबाबदार आहे आणि या विषयावर भाजपचे नेते देशाची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट होते, असे म्हटले. राऊतांनी केंद्र सरकारवर केलेल्या या टीकेला २४ तास उलटच नसतानाच, नागपूरातील वीज कामगार महासंघांने महिनाभरापूर्वी राऊत यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र व्हायरल झाले आहे.

नागपूरचा वीज कामगार महासंघ हा उर्जा विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोठा नोंदणीकृत संघ आहे. या संघाने १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राऊतांच्या अकार्यक्षमतेचा पाढा वाचला आहे. आता हे पत्र व्हायरल झाले आहे. वसुलीच्या नावाखाली उर्जामंत्र्यांनी सर्व स्तरावरील कामगारांना नियमबाह्य काम करण्यास सांगितल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आला आहे. वीजेची थकबाकी वसूल करण्यासंदर्भातील मंत्र्यांच्या चुकीच्या धोरणामुळे कर्मचाऱ्यांना मारहाण, मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागल्याचे पत्रात म्हटले आहे. प्रशासनाची एकंदरीत वर्तणूक पाहून हे राज्य इंग्रजांचे की लोकशाहीचे, असे पत्रात नमूद करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या