आंदोलनातील चेंगराचेंगरीत खासदार मनोज तिवारी जखमी


नवी दिल्ली 

गर्दीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढतील म्हणून केजरीवाल सरकारने सार्वजनिक ठिकाणी छट पूजेच्या कार्यक्रमांना बंदी आणली आहे. केजरीवाल सरकारच्या या निर्णयाविरोधात मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. मात्र या आंदोलनावेळी  झालेल्या चेंगराचेंगरीत भाजपचे खासदार मनोज तिवारी जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने सफदर जंग हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. 

छट पूजेच्या कार्यक्रमांना परवानगी द्या, या मागणीसाठी भाजपा खासदार मनोज तिवारी आपले शेकडो कार्यकर्ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाकडे जाऊ लागले. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे बॅरिकेड्स तोडले आणि पुढे जाऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी पाण्याचा जोरदार मारा केला. यावेळी आंदोलकंमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि मनोज तिवारी जखमी झाले. मनोज तिवारींना तातडीने सफदर जंग हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या