वाल्हे येथे राष्ट्रवादी चे आंदोलन


वाल्हे प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री, अजित पवार सकाळी सहा वाजल्यापासून महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करीत असताना त्यांची काम करण्याची वेगळी पद्धत, तरूणांना आकर्षित करीत आहे. यामुळे अजित पवार यांना मिळत असलेल्या प्रसिद्धीचा धसका केंद्र सरकारने घेतला असून केवळ  त्यांना बदनाम करण्यासाठी, आयकर विभागाने केलेली छापेमारी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप"  जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी वाल्हे येथील आंदोलना दरम्यान केला.

वाल्हे (ता.पुरंदर) येथे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी , व केंद्र सरकारच्या निषेध व्यक्त करण्यासाठी र्आंदोलन करण्यात आले. यावेळी  महात्मा फुले स्मारकाला पुष्पहार अर्पण करून  या आंदोलनास सुरुवात झाली .

यावेळी गावचे सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, पिसुर्टीचे माजी सरपंच अशोक बरकडे, माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, सुर्यकांत पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संत्यवान सुर्यवंशी, राष्ट्रवादी सरचिटणीस निलेश शिंदे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष संदेश पवार, अनिल भुजबळ, अंकुश पवार, दिपक कुमठेकर, मोहम्मद भाई इनामदार, संतोष गायकवाड, गोरख कदम, विक्रम भुजबळ, रवींद्र सुर्वे, शांताराम दुर्गाडे, तानाजी भुजबळ, रामभाऊ भुजबळ आदी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. दुर्गाडे पुढे म्हणाले, "यापूर्वीच्या काळात राजकारणामध्ये अनेक सरकारे आली- गेली. मात्र, कधीही अशी  परिस्थिती पाहिली नव्हती. केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेल्या एजन्सींचा आणि सत्तेचा वापर हा राजकीय सुडासाठी करत आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे

शक्तिस्थळ आहेत. ते शक्ती स्थळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, भाजपच्या माध्यमातून केला जात आहे. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. अजित पवार यांचे नेतृत्व जपण्याचे काम आम्ही करू. अजित पवार यांचे कवचकुंड बनण्याचे काम येथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता करेल, असा विश्वास प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी आंदोलना दरम्यान व्यक्त  केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या