शिवरायांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम शिवअभिषेकाच्या माध्यमातून : करण नवले


शेवगाव प्रतिनिधी

छत्रपती शिवरायांनी अठरापगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले. त्या मावळ्यांमध्ये छत्रपती शिवरायांसाठी बलिदान देण्याची ताकद होती. स्वराज्य स्थापन करताना शिवरायांचे ब्रीद वाक्य होते. पोटास लावणे आहे म्हणजेच प्रत्येक मावळ्याला रोजगार मिळाला पाहिजे. अशी शिवरायांची संकल्पना होती. त्याच विचारांची आठवण जिवंत ठेवण्याचे काम शिव अभिषेकाच्या माध्यमातून होत आहे असे गौरवोद्गार दैनिक राष्ट्र सह्यादीचे संपादक करण नवले यांनी काढले. 

शेवगाव शहरात शिव स्मारक समितीच्या माध्यमातून प्रत्येक शुक्रवारी शिवरायांच्या पुतळ्यास शिव राज्य अभिषेक केला जातो. यावेळी करण नवले यांच्या हस्ते शिवराज्य अभिषेक पार पडला त्याप्रसंगी करण नवले हे बोलत होते. याप्रसंगी मराठा भूषण ह.भ.प. चंद्रकांत महाराज लबडे, स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले, संजय अकोलकर, दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे व्यवस्थापक दत्तात्रेय मेटे, तालुका प्रतिनिधी दादासाहेब डोंगरे, शहर प्रतिनिधी तारामती दिवटे, चापडगाव प्रतिनिधी कृष्णा मडके, डॉ निरज लांडे, अमोल घोलप, दत्ता फुंदे, पत्रकार शाम पुरोहीत, डॉ. कृष्णा देहाडराय, संतोष कोळगे, डॉ. धर्मराज सुरोसे , नितेश गटकळ, अक्षय खोमणे, प्रदिप जाधव, सखाराम ढोरकुले, कृष्णा लबडे, कुंडलिक लबडे, पवन मुखेकर, दिपक शेळके, रोहन घुगरे, गौरव डोंगरे आदी उपस्थित होते.  

पुढे बोलताना करण नवले म्हणाले, चंद्रकांत महाराज लबडे यांनी सुरू केलेला शिवराज्य अभिषेक ही महाराष्ट्रातली वेगळी संकल्पना आहे. शिवरायांच्या मावळ्यांनी चंद्रकांत लबडे यांचा आदर्श घेऊन प्रत्येक शहरात शिवअभिषेक सुरु करावा. चंद्रकांत महाराज लबडे सारख्या मावळ्यांना छत्रपतींचा आशीर्वाद असल्याशिवाय ही कल्पना डोक्यात येऊ शकत नाही. स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले यांनी सांगितले की, आतापर्यंत १२० अभिषेक चंद्रकांत महाराज लबडे यांनी पार पाडलेले आहे. राज्यामध्ये कुठेही अशा प्रकारचा विचार कुणी आत्तापर्यंत विचार अमलात आणलेला नाही. शिवरायांचे नाव घेऊन बरेच लोक राजकारण करतात मात्र खरे मावळे ह. भ. प. चंद्रकांत महाराज लबडे सारखे शिवरायांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी शिवअभिषेक सारख्या संकल्पना राबवत असतात. चंद्रकांत महाराज लबडे यांना लवकरच स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. असे उद्गगार डॉ कृषिराज टकले यांनी काढले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या