फटाका स्टॉलसाठी जाहीर निविदा करा - बाळासाहेब दूतारे


श्रीगोंदा प्रतिनिधी

तालुका शिवसेनेच्या वतीने फटाका स्टॉल उभारणे कामी जागा उपलब्ध करण्यासाठी रीतसर वर्तमानपत्र व दवंडी द्वारे जाहीर निविदा मागणी करून जागा उपलब्ध करून देण्याबाबत मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांना निवेदन देण्यात आले.

श्रीगोंदा शहरात नगरपालिका हद्दीमध्ये दरवर्षी दिवाळीनिमित्त बाजारतळ येथे फटाके स्टॉल उभारणे कामे नगरपालिका मार्फत जागा उपलब्ध करून दिली जाते फटाके स्टॉल साठी जागा देताना पालिकेमार्फत कोणत्याही प्रकारे पारदर्शीपणा न वापरता नेहमीच्या हितसंबंध येतील लोकांची जागा फटाके स्टॉल उभारण्यासाठी दिली जाते. तसेच या प्रक्रियांमध्ये अनियमितता दिसून येत आहे. तसेच सदर परवाना देताना कोणतीही कागदपत्राची शहानिशा केली जात नाही. वास्तविक फटाके स्टॉल उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देताना पालिकेने रीतसर जाहीरपणे वर्तमानपत्राद्वारे अथवा दवंडी द्वारे जागा मालकाकडून निविदा मागणी करून नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे प्राप्त झालेल्या निविदा निविदा मधून पालिकेला महसूल मिळेल. अशा निविदेचा विचार करून जागामालकाला त्याच्या जागेमध्ये फटाका स्टॉल धारकांना उभारणे कामी परवानगी देणे आवश्यक आहे.

या जागेवर श्रीगोंदा नगर परिषदेचे आठवडा बाजार साठी आरक्षण आहे. तरी या जागेवर पालिकेचा अधिकार आहे याच्या भाडे पोटी रक्कम खाजगी मालक घेऊन पैसे कमवत आहे. पालिकेने ही जागा सदर 15 दिवसासाठी ताब्यात घेऊन पालिकेचा कशाप्रकारे महसूल मिळेल याची दक्षता घेऊन कारवाई करावी नाहीतर अन्य ठिकाणी फटाका स्टॉल धारकांना जागा उपलब्ध करून देण्यात यावी.

यावर लवकरच कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने  तीव्र स्वरूपाची आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे शिवसेना उपतालुका प्रमुख सुरेश देशमुख युवा सेना तालुका प्रमुख हरिभाऊ काळे, युवा सेना तालुका प्रमुख निलेश गोरे, महिला आघाडी तालुकाप्रमुख मनिषा काळे, युवा सेना शहर प्रमुख ओमकार शिंदे, युवासेना उपशहर प्रमुख जयराज गोरे उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या