मुलाचा खुन करुन पसार झालेला आरोपी बाप अवघ्या ३ तासात पकडला


बारामती 

घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्याचा राग मनात ठेऊन चक्क बापाने सावत्र मुलाच्या डोक्यात लोंखडी धातूच्या कोयत्याने डोक्यात व मानेवर वार करत खुन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मारुती साधुराम जाधव याला बारामती तालुका पोलीस गुन्हे शोध पथकाने अवघ्या तीन तासाच्या आत तपास लावत अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पारवडी गावच्या हददीत शिपकुले वस्ती येथे कातकरी समाजाच्या एका इसमाने स्वतःच्या मुलाच्या डोक्यात कोयत्याने  वार करुन खुन केला असल्याची माहिती पारवडी गावचे पोलीस पाटील यांनी फोनव्दारे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना माहिती दिली.

सदर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे आपल्या पथकाला  घेऊन घटना स्थळावर रवाना झाले .घटना स्थळी रवाना झाल्यानंतर तपासा दरम्यान मारुती साधुराम जाधव हा कातकरी समाजाचा असून तो मजुरी साठी पारवडी गावच्या हददीत आला असुन त्याने त्याचा सावत्र मुलगा गोपीनाथ मारुती जाधव याची घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्यारागात मारुती जाधव याने स्वतःच्या  मुलाच्या डोक्यात लोंखडी धातुचे कोयत्याने डोक्यात व मानेवर वार करुन खुन करुन पशार झाल्याची माहिती घटना स्थळी मिळाली. 

त्यानंतर सदर आरोपीला ताबडतोप अटक करण्याची सूचना पोलीस निरीक्षक महेश ढावाण  यांनी दिल्या पंरतु सदर आरोपी हा मोबाईल वापर करीत नव्हता तसेच त्याचे कोणी नातेवाईक वगैरे नसल्याने व सदर आरोपीची कोणतीही ओळख ,फोटो उपलब्ध नसल्याने सदर आरोपी अटक करणे जिकीरीचे काम होते. तरीही गुन्हे शोध पथकाने मोठ्या शितापतीने आरोपीचा शोध घेत १० ते १५ किमीचा वनविभागाचा टप्पा पायी सर्च करुन अखेर  वनविभागातील झाडीत लपलेल्या आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक ढवाण करत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते ,उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे , पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या