समीर वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीची दहशत : नवाब मलिक


गोंदिया 

शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी न घेता समीर वानखेडे याने प्रायव्हेट आर्मी तयार करुन दहशत निर्माण केली होती हे भविष्यात सिध्द करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान क्रुझवर ड्रग्जची रेव्ह पार्टी झाली आणि त्या पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून जे जेवण गेलं त्यातूनच ड्रग्ज गेलं होतं ते सगळे पुरावे समोर आणणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. समीर वानखेडे याने एक प्रायव्हेट आर्मी तयार केली असून त्यामध्ये प्लेचर पटेल, आदिल उस्मानी, के. पी. गोसावी, मनीष भानुशाली यासारखे अनेक लोक आहेत. हे सर्व घरात घुसून ड्रग्ज ठेवत आहेत आणि लोकांना अडकवत आहेत हे सगळं फर्जीवाडा असून याची संपूर्ण माहिती काढली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या