'आपणहून विकेट देणार नाही'

वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्र्यांची राजकीय फटकेबाजी 


मुंबई

'लूज बॉल आला तर सोडायचा नाही, फटका मारायचाच! तो सोडला तर संधी हुकलीच म्हणून समजा, ही गोष्ट क्रिकेट बघता बघता शिकलो आहे. राजकारणाच्या खेळपट्टीवरही तेच आवश्यक आहे, असं सांगतानाच, 'आपणहून विकेट देणार नाही,' असा 'स्ट्रेट ड्राइव्ह' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे.

दिलीप वेंगसरकर स्टँडचे नामकरण, सुनील गावस्कर यांच्यासाठी हॉस्पिटॅलिटी बॉक्स तसंच माधव मंत्री यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वानखेडे स्टेडियमवर खास सोहळ्याचे  आयोजन करण्यात आलं होतं. आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. सचिन तेंडुलकर यांनी माधव मंत्री, गावस्कर आणि वेगसरकर यांच्या आठवणींना उजळा दिला. उद्धव ठाकरे यांनी ही संधी साधत यावेळी जोरदार फटकेबाजी केली.

'क्रिकेटर व्हावंसं वाटत होतं, पण क्रिकेटर झालो नाही. आम्ही क्रिकेट पाहणारे. क्रिकेट बघता बघता काही गोष्टी शिकता मात्र आल्या. लूज बॉल आला तर फटका मारलाच पाहिजे, तो जर का सोडला तर चान्स हुकला. राजकारणातही तेच लागू होतं. त्यामुळं आपणहून विकेट देणार नाही,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या