प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदस्यासाठी सरपंच धनावडेंचा उमेदवारी अर्ज दाखल.


नसरापूर प्रतिनिधी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पुणे महानगर नियोजन समितीच्या 30 सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असताना ग्रामपंचायत सरपंच पदातून उमेदवारी अर्ज भरण्याचा दि.13 ऑक्टोबर चा हा शेवटचा दिवस होता. ग्रामपंचायत सरपंच पदातून वेळू ता. भोर येथील सरपंच आप्पा धनवडे यांनी  दि. 13 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.

यावेळेस जीवन धनावडे,सोमनाथ सोमाणी,माऊली पांगारे,हिरामण पांगारे,मंगेश सुर्वे,ग्रामपंचायत सदस्य अमोल पांगारे,गणेश मालुसरे यावेळेस उपस्थित होते.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक यांमधून 22 सदस्य नगरपरिषद क्षेत्रात 1 सदस्य आणि ग्रामपंचायतीच्या सरपंच मधून 7 सदस्य निवडण्यात येणार आहे. पीएमआरडीए नुकताच हद्दीचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे.

नेमकी कोणत्या पक्षाच्या माध्यमातून त्यांची  उमेदवारी होणार आहे ते निश्चितच आगामी दिवसात पाहण्यास मिळणार आहे.   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या