सभापती घुलेंच्या प्रयत्नामुळे अतिवृष्टीचे अनुदान प्राप्त


ढोरजळगांव

शेवगाव तालुक्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी. यासाठी शेवगाव पाथर्डी तालुक्याचे माजी. आ. चंद्रशेखर घुले , जिल्हा परिषदचे अध्यक्ष  राजश्री चंद्रशेखर घुले , पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज नरेंद्र घुले यांच्या प्रयत्नातून अतिवृष्टी व पुर परीस्थितीमध्ये नुकसान झालेल्या गावांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे १० कोटी प्राप्त झाले असून तालुक्यातील ११ गावांंना ५ कोटी ८९ लाख ९९ हजार ४५० रुपये तातडीने वाटप करण्यात येणार आहे. शेवगाव (१६ लाख ५९ हजार) , वडुले बुद्रुक (२७ लाख ७३ हजार), खरडगाव ( ५२ लाख ७४ हजार ), जोहरापूर ( ३ लाख ५२ हजार २५० ), खामगाव ( १ लाख १३ हजार ५०० ), आखेगाव ति.( २८ लाख ७२ हजार २०० ), आखेगाव डोंगर ( १२ लाख ८ हजार ७०० ) , वरूर खुर्द ( १५ लाख १४ हजार ९०० ), वरुर बुद्रुक ( ७५ लाख ५६ हजार ), भगुर ( ३७ लाख ३७ हजार ८००), कांबी ( १ कोटी १९ लाख २३ हजार ९००), गायकवाड जळगाव ( ५६ लाख १४ हजार २०० ) गावानुसार ती वितरित होणार आहे. तसेच पुर परीस्थितीमधील सर्व गावांतील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई म्हणून १० कोटी रुपये रक्कम प्राप्त झाली असल्याचे सभापती डॉ. घुले यांनी बोलताना सांगितले. 

डॉ. क्षितिज घुले यांच्या प्रयत्नांमुळे व पाठपुरावा केल्यामुळे हे सर्व नुकसान भरपाईचे अनुदान प्राप्त झाले आहे व ते लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग  करण्यात येणार आहे.शेवगाव तालुका व पुरपरिस्थिमुळे नुकसान झालेल्या सर्व गावांचे सरपंच व गावांच्या ग्रामस्थांच्या वतीने घुलेंचे आभार व्यक्त केले जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या