Breaking News

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस देणार ४० टक्के महिला उमेदवार

प्रियंका गांधींची घोषणा


लखनौ

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील महिलांना राजकारणात येण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकीट महिलांना देणार असल्याची घोषणा प्रियंका गांधी यांनी केली. 

आज लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ही पत्रकार परिषद देश आणि उत्तर प्रदेशच्या महिलांना समर्पित असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, 'येत्या उत्तर प्रदेश निवडणुकीत आम्ही ४० टक्के तिकिटे महिलांना देऊ. हा निर्णय त्या सर्व महिलांसाठी आहे ज्यांना उत्तर प्रदेशात बदल हवा आहे, राज्याची प्रगती हवी आहे. महिला राजकारणात पूर्ण सहभागी होतील'.


No comments