Breaking News

प्रिन्स चार्ल्सची गाडी चालते वाईन आणि चीजवर


मुंबई 

ब्रिटनच्या राजघराण्याची श्रीमंती आणि त्यांचा थाट आख्ख्या जगानं पाहिला आहे. ब्रिटनमध्ये होणाऱ्या कोणत्याही शाही कार्यक्रमात तो ठसठशीतपणे दिसून येतो. प्रिन्स चार्ल्स यांनी पर्यावरणपूरक दृष्टीकोनातून चक्क त्यांची विंटेज कार अॅस्टन मार्टिनमध्ये वाईन आणि चीजचं मिश्रण इंधन म्हणून वापरायला सुरुवात केली. याचे निष्कर्ष अॅस्टन मार्टिन स्पेशालिस्ट्सलाही आश्चर्याचा धक्का देणारे होते. कारण वाईन आणि चीजवर अॅस्टन मार्टिन आधीपेक्षाही उत्तम चालत असल्याचं स्पष्ट झालं! खुद्द प्रिन्स चार्ल्स यांनीच हा सगळा प्रयोग सांगितला आहे!

प्रिन्स चार्ल्स हे सुरुवातीपासूनच कारप्रेमी आणि तितकेच पर्यावरणप्रेमी राहिले आहेत. त्यामुळेच त्यांच्या ताफ्यात असणाऱ्या कार्स या अधिकाधिक पर्यावरणप्रेमी कशा होतील, यावर त्यांचा भर असतो. पर्यायी इंधनासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. याचाच परिणाम म्हणून त्यांना २१व्या वर्षी राणी एलिझाबेथ दुसरी यांनी गिफ्ट दिलेली अॅस्टन मार्टिन डीबी६ त्यांनी पारंपरिक इंधनाऐवजी अपारंपरिक पर्यायी आणि पर्यावरणपूरक इंधनावर चालवण्याचा निर्णय घेतला.


No comments