आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार :आ. लंकेे


पारनेर प्रतिनिधी। राष्ट्र सह्याद्री

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात यापुढील काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत आमदार नीलेश लंके यांनी विरोधकांना आव्हान दिले.

जिल्हा परिषदेच्या ढवळपुरी गटातील विविध गावांमधील ९ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार लंके यांच्या हस्ते रविवारी झाले.त्यानंतर भाळवणी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. विधान सभा सदस्यत्वाच्या कारकिर्दीस दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमदार लंके यांची लाडूतुला करण्यात आली.पंचायत समितीचे माजी सदस्य गंगाराम रोहोकले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे,बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले,पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धुरपते,आत्मा समितीचे अध्यक्ष राहुल झावरे,उद्योजक सुरेश धुरपते,अशोक सावंत,दादा शिंदे, कारभारी पोटघन, अभयसिंह नांगरे, विक्रम कळमकर,नानासाहेब रोहोकले,अशोक रोहोकले,विजय औटी, जितेश सरडे आदी उपस्थित होते.

आमदार लंके म्हणाले की, पुढील वर्षात जिल्हा परिषद,पंचायत समिती,बाजार समिती, पारनेर नगर पंचायतीसह विविध गावांच्या विकास संस्थांच्या निवडणुका होत आहेत.या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार आपण केला आहे.पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांचा उत्साह,त्यांनी करोना संसर्ग काळात निस्वार्थी भावनेने केलेले काम पहाता जनता यापुढील काळात विरोधकांना जवळपास फिरकू देणार नाही असा आपला विश्वास असल्याचे आमदार लंके म्हणाले.

प्रास्ताविक बाबासाहेब तरटे यांनी तर सूत्रसंचालन संतोष रोहोकले यांनी केले.

विधानसभा सदस्यत्वाच्या तिसऱ्या वर्षात पदार्पण करताना,भाळवणी येथील कोविड उपचार केंद्रातून हजारो रुग्ण बरे होऊन घरी परतले याचे समाधान वाटते.करोना संसर्गामुळे विकास कामांच्या निधीला कात्री लागलेली असताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी पारनेर-नगर मतदारसंघासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला.त्यामुळे मतदारसंघातील अनेक विकास कामे मार्गी लागली. प्रलंबित कामांना गती मिळेल.त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- नीलेश लंके, आमदार.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या