नक्षलींच्या 'त्या' 26 प्रेतांमध्ये मिलिंद तेलतुंबडे

नक्षली चळवळीला धक्का; डीआजी संदीप पाटील यांची माहिती


गडचिरोली 

पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून खाताना केलेल्या 26 नक्षलवाद्यांमध्ये नक्षली चळवळीचा देशातील टॉपचा कमांडर मिलिंद तेलतुंबडे याचे प्रेत मिळाल्याची माहिती नागपूर विभागाचे डीआयजी संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, छत्तीसगडमधील शरणागती पत्करणाऱ्या एका नक्षलवाद्याने माहिती दिली होती की नक्षलवाद्यांचा टॉप कमांडर मिलिंद तेलतुंबडे हा मोठ्या प्रमाणावर नक्षलींची भरती करण्याच्या तयारीत आहे.

त्या माहितीच्या आधारे सी- 60 जवानांनी काल मिलिंद तेलतुंबडे आणि 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. गडचिरोली पोलिसांना मिळालेलं हे यश मोठं असून त्यामुळे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगडमधीलच नव्हे तर देशातील नक्षलवादी चळवळीला धक्का मोठा धक्का बसला आहे.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले की, आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आहेत. त्यानंतर सोमय मुंडे यांच्या नेतृत्वात सी - 60 च्या दलाने अभियान राबविले. सकाळी सहाच्या सुमारास नक्षलींनी अत्याधुनिक हत्यारांच्या सहाय्याने फायरिंग सुरू केले. त्यामध्ये ग्रेनेडचा ही वापर केला. त्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. 26 नक्षलवाद्यांची जी प्रेतं मिळाली त्यात मिलिंद तेलतुंबडे याचा समावेश आहे. एकूण 16 नक्षलींची ओळख पटली आहे, 10 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही.

काल झालेल्या पोलीस-नक्षलवादी चकमकीत सी- 60 चे सुमारे 300 जवान सहभागी झाले होते. कालच्या घटनेत मारले गेलेले बहुतांशी नक्षली गडचिरोली सह छत्तीसगड परिसरातील होते. मात्र, ते गडचिरोली मध्ये कार्यरत असलेल्या दलम चे आहेत.

जरी 26 नक्षली मारले गेले असले तरी इतर काही नक्षली जखमी झाले असावेत, अशी शक्यता आहे. आम्ही त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. मृत नक्षलीची प्रेतं त्यांच्या नातलगांना पूर्ण पंचनामा, पोस्टमार्टम आणि कायदेशीर करून सोपविले जातील, असे पोलीस अधिक्षक अंकित गोयल म्हणाले.

मिलिंद, दिपक आणि सह्याद्री...

चकमकीत खात्मा करण्यात आलेला मिलिंद तेलतुंबडे यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावाचा रहिवासी असून भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. त्याच्यावर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याशिवाय जांभुळखेडा स्फोटात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. मिलिंद हा दीपक आणि सह्याद्री अशा विविध नावानी चळवळीत वावरतो. सोबतच दंडकारण्य केंद्रीय समितीचा तो सदस्य असून त्याच्यावर एक कोटीच्यावर बक्षीस आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या