डोंबालवाडी पाठोपाठ कोरेगावला बिबट्याचे दर्शन


कर्जत 

कोरेगाव ता.कर्जत येथील वस्तीवर बिबट्याने एका वासरू आणि कुत्र्यावर हल्ला केला. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी मोहन शेळके यांनी भेट दिली. पायाच्या ठस्यावरून बिबट्याच असण्याची शक्यता शेळके यांनी वर्तवली असून त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्यावतीने सापळा लावण्यात येईल अशी माहिती दिली.

शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान कोरेगाव (ता कर्जत) येथील वस्तीवर एका गायीच्या वासरूवर आणि पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. यामध्ये कुत्रा गतप्राण झाला असून वासराला चावल्याच्या खुणा आहेत. सकाळी कर्जत वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी घटनास्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली. लगत ऊसाचे क्षेत्र असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन केले. पायाच्या ठशा वरून सदर हल्ला करणारा प्राणी बिबट्याच असल्याचे शेळके यांनी दुजोरा दिला. बिबट्याच्या शोधमोहिमेसाठी वनविभागाने पथके नियुक्ती केले असून कोरेगाव परिसरात बिबट्यास जेरबंद करण्यासाठी सापळा लावण्यात येईल अशी माहिती दिली. डोंबाळवाडी पाठोपाठ कोरेगाव या ठिकाणी देखील बिबट्याचे दर्शन झाल्याने  शेतकरी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या