तरुण कापूस व्यापाऱ्याची तहसील समोर आत्महत्या

शेवगाव तहसीलच्या गेटसमोर लिंबाच्या झाडाला घेतला गळफास 

तालुका प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री


शेवगाव  : येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला, कापसाचा व्यापार करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दि. ३० नोव्हेबर रोजी सकाळी समोर आली आहे. 


      भाऊसाहेब घनवट ( अंदाजे वय २५ ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नावं असून  तो तालुक्यातील नजीकबाभूळगाव येथील रहिवासी होता. आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत. सदर युवक कपाशीचा व्यापार करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या