नूतन स्मशानभूमीत स्ट्रीट लाईटची व्यवस्था


लिंपणगाव ( प्रतिनिधी )

श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव समजले जाणारे लिंपणगाव येथील स्मशानभूमीत ग्रामपंचायत प्रशासनाने 15 व्या वित्त आयोगातून दोन लाख खर्च करून स्ट्रीट लाईट ची व्यवस्था केल्याने ग्रामस्थांमधून ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले आहे. दरम्यान अनेक दिवसापासून येथील स्मशानभूमीत विद्युत पुरवठा काही तांत्रिक अडचणीमुळे खंडित झाला होता. रात्री-अपरात्री मृत व्यक्तीचा अंत्यविधी करताना ग्रामस्थांना मोठ्या प्रसंगांना सामोरे जावे लागत होते. त्याबरोबरच सरपटणारे प्राण्यांची देखील उपस्थित शोकाकुल व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व परिस्थितीवर मात करत गावच्या सरपंच सौ शुभांगीताई जंगले, उपसरपंच अरविंद कुरुमकर तसेच सर्व सदस्य यांनी प्रथम स्मशानभूमीत विद्युत प्रवाह सुरळीत करण्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून अंदाजे जवळपास दोन लाख रुपये खर्च करून स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आले आहे. वास्तविक पाहता कोरोनाच्या कालावधीमध्ये या परिसरातील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अशावेळी अंत्यविधी करताना रात्री-अपरात्री नाही येत नाही अंधारामध्येच मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करावे लागत होते रात्रीच्या वेळी आजूबाजूच्या काटेरी झाडांमुळे सरपटणारे विषारी प्राण्याची भीती सर्वांना होती, या सर्व बाबी ग्रामपंचायत प्रशासनाने लक्षात घेऊन प्रथम 15 व्या वित्त आयोगातून स्मशानभूमी सभोवताली स्ट्रीट लाईट च्या माध्यमातून प्रकाशमय वातावरण करण्यात आले आहे.

दरम्यान मंगळवारी सकाळी नऊ वाजता या स्ट्रीट लाईट चे उद्घाटन गावचे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर उपसरपंच अरविंद कुरुमकर ग्रामपंचायत सदस्य शामराव लष्करे मेजर खासेराव पवार आदींच्या शुभहस्ते करण्यात आले. तात्काळ या कामास गती देऊन स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आली कॉन्ट्रॅक्टर योगेश पंधरकर, सागर रेवगे, आर्यन लष्करे, अजय कुरुमकर, नाना रेवगे आदी यावेळी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या