राष्ट्रवादी कार्यकर्ते सालकेंचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश....

 विकासाच्या मुद्यावर तालुक्यात परीवर्तन : काशिनाथ दाते 


पारनेर तालुका प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील जवळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पारनेर येथे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी अहमदनगर जि.प.बांधकाम व कृषि समीतीचे सभापती काशिनाथ दाते बोलत होते. 

यावेळी बोलताना दाते म्हणाले, पारनेर तालुक्यामधे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना पक्षाचे जेष्ठ नेते महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांचे नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करत असतो. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला बांधकाम समिती मध्ये काम करण्याची संधी दिली. त्या समितीच्या माध्यमातून आपण गेली दोन वर्षांमध्ये तालुक्यात जे काही विकासाचे काम उभे केले तसेच, सभापती गणेश शेळके यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कामातुन ताकद दिली, डॉ. श्रीकांत पठारे यांनी त्यांच्या गटात काम करण्यासाठी जो काही पाठपुरावा केला त्यातूनच खऱ्या अर्थाने मला सगळीकडे परिवर्तन दिसत आहे.

जवळा येथील ग्रामपंचायत सदस्य अशोकराव सालके व त्यांचे सहकारी यांचा जि.प.बांधकाम व कृषी समीतीचे सभापती काशिनाथ दातेसर, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमधे प्रवेश झाला.

यावेळी शिवसेना उप तालुका प्रमुख किसनराव सुपेकर,युवा उद्योजक प्रदीप पठारे, शेतकरी तालुका संघटना प्रमुख सूर्यकांत सालके,संजय पठारे,उद्योजक सतीश बरशिले,संतोष पठारे,गोरख सालके ,गण प्रमुख मंगेश सालके, उद्योजक राजेंद्र पठारे, अनिल पठारे , मंगेश पठारे, प्रगतशील शेतकरी दादाभाऊ डेरे, उद्योजक पांडुरंग बरशिले, उद्योजक निलेश सालके, उद्योजक संतोष सालके, गजानन सोमवंशी ,उद्योजक संपत सालके, शुभम पठारे, महेश चौरे, गणेश देशमुख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना ग्रामपंचायत सदस्य,अशोक सालके म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाचे आम्ही जुने कार्यकर्ते आहोत. पक्षामधे नविन आलेल्या प्रतिनिधींचे आम्हाला सहकार्य होत नव्हते. पक्षातील लोकांना मदत करण्याऐवजी त्यांनी पक्षाबाहेरील लोकांनाच मदत केली. आम्ही वेळोवेळी मागणी केलेली कामे जाणीव पूर्वक पक्ष नेतृत्वाकडून टाळली जायची. त्यामुळे विकासकामे करताना अनेक अडचणी आल्या. ज्या प्रभागातून लोकांनी मला निवडून दिले, त्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला राष्ट्रवादी पक्षातून सहकार्य मिळत नव्हते. ज्या पक्षामधे लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील त्या पक्षात राहण्यात अर्थ उरला नव्हता आणि विकासाचा बॅकलाॅक भरुन काढण्यासाठी विकासाच्या मुद्यावरच मी आज शिवसेना पक्षामधे प्रवेश करत आहे. माझ्या गावात व प्रभागात जी काही विकासकामे अपूर्ण आहेत ती आता जिल्हापरीषदेचे बांधकाम व कृषी समीतीचे सभापती दाते, सभापती गणेश शेळके व पंचायत समीती सदस्य डाॅ.श्रीकांत पठारे यांच्या माध्यमातुन पूर्ण करणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या