मौर्य क्रांती संघाच्या परिवर्तन यात्रेचे इंदापुरात स्वागत


इंदापूर  प्रतिनिधी

मौर्य क्रांती संघ आयोजित तिसरी धनगर जागृती परिषद मौजे जेजुरी, ता. पुरंदर जि. पुणे येथे दि.२१ नोव्हेंबर २०२१ रोजी संपन्न होत आहे.त्या पार्श्वभूमीवर दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी यवतमाळ येथून या परिवर्तन यात्रेला सुरूवात झाली होती. ती परिवर्तन यात्रा एकुण ३२ जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत गुरुवारी (दि.१९) पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आली. त्यावेळी इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी परिवर्तन यात्रेचे स्वागत करून रॅली प्रदर्शन केले.

प्रसंगी बोलताना मौर्य क्रांती संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सत्यवान दुधाळ म्हणाले की,धनगर बांधवांची वैचारिक जागृती करून त्यांच्यामध्ये इमानदार नेतृत्व निर्माण करणे हा या परिवर्तन यात्रेचा उद्देश आहे. तसेच यावेळी मौर्य क्रांती संघाचे राज्य सचिव प्रताप पाटील अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, धनगर समाज हा महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रमाणात दुसऱ्या स्थानावर असूनही लोकसभेत एकही खासदार नाही. तसेच विधानसभेत ही लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व नाही. धनगर जमात ही राज्यकर्ती जमात होती.परंतु आज समाजाला निवडणूकीच्या वेळी प्रस्थापित पक्षांकडे तिकीटं मागावी लागतात ही शोकांतिका आहे.

यावेळी मौर्य क्रांती संघाचे तालुकाध्यक्ष अजित शेंडगे, सुर्यकांत पुजारी, प्रकाश पवार, सुरज धाईंजे, संतोष क्षीरसागर, महेश लोंढे, विजय चव्हाण, पोपट आठवले, बलभीम राऊत, किरण लोंढे, वसिम शेख, आझाद सय्यद, नागेश भोसले, गणेश चंदनशिवे, भारत चंदनशिवे, इम्रान बागवान, अक्षय मखरे व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन देशमाने यांनी केले आणि प्रास्ताविक संजय शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल मारकड यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या