रेशनचे धान्य बाजारात विकल्यास लाभार्थीचे धान्य बंद


शिरुरकासार

द्ररिदय रेषे खालील नागरिक गोरगरीब लोक शेतकरी तसेच गरजूसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे स्वस्त धान्य पुरविण्याची योजना आहे. मात्र रेशनचे धान्य घेऊन ते परत दुकानदारालाच किवा बाजारात विक्री करण्याचे प्रकार वाढल्याची माहिती आहे. अशा प्रकारे धान्याची अफरातफर केल्यास लाभार्थ्यांचे धान्य बंद होऊ शकते.

धान्य खरेदी करणारा व्यापारीही अडचणीत येऊ शकतो. रेशनवर ज्वारी, बाजरी, गहू, साखर, तेल, तांदुळ पर्यंत सगळ्या वस्तू स्वस्तात मिळतात वंचित घटक तसेच गरजू उपाशी राहू नयेत यासाठी ही योजना आहे. मात्र काही धनदांडगे मात्र या योजनेचा सर्रास लाभ घेतात. स्वस्तातील धान्य घेऊन ते परत दुकानदाराला किवा बाजारात चढ्या दराने विक्री करण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत. मात्र पुरवठा विभागाकडून वितरित झालेल्या धान्याला पाय फुटतात की ते खरंच गरजवंतापर्यत पोहोचते यांची खातंरजमा केली जात नाही. त्यामुळे गैरवापर करणाऱ्यानां मोकळे रान मिळत असल्याचे चित्र आहे. दरम्यान प्रशासनाने याबाबत लक्ष घालून शासनाकडुन रेशन दुकानाद्वारे केला जाणारा धान्य पुरवठा व्यवस्थित होता की नाही? हे पाहणे गरजेचे असून कारवाई होत नसल्यास कारवाई करणे ही गरजेचे आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या