किल्ले स्पर्धेचे बक्षिस वितरण


सोमेश्वरनगर प्रतिनिधी 

बारामती तालुक्यातील वाणेवाडी मध्ये किल्ले बनवा उपक्रम "साद संवाद स्वच्छता ग्रुप"च्या वतीने दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या बाल चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या सर्व सहभागी बालकांना "साद संवाद स्वच्छता ग्रुप" च्या वतीने पारितोषिक  तर विविध स्वरूपाची रोपे, ट्रॉफी स्वरूपाची पारितोषिक प्रदान करण्यात आली , मुलांना आपल्या इतिहासाची त्याचे साक्षीदार असलेल्या गडकोटांची माहिती व्हावी त्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्यांचे स्वराज्यनिर्मितीसाठी चे असणारे योगदान आणि एकूणच या सर्व काळाचा मुलांकडून अभ्यास व्हावा, तसेच  यादृष्टीने त्यांच्याबद्दलची आवड वृद्धिंगत व्हावी या दृष्टीनेच "साद संवाद स्वछता ग्रुप" गेले पाच वर्ष हा उपक्रम राबवत आहे . सहभागी मुलांना प्रोत्साहन पर बक्षिसे देऊन त्यांच्या बनवलेल्या गडकिल्ले प्रतिकृती  कौतुकही केले ,  आयोजित केलेल्या या उपक्रमात सुमारे 150 बालकांनी सहभाग नोंदवला तर मुलांनी वेगवेगळ्या गडकोटांच्या आकर्षक प्रतिकृती उभारल्या होत्या,

आयोजित किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण प्रसंगी कोविड योध्दा , गुणवंत विद्यार्थी  गुणगौरव असा कार्यक्रम 'रामराजे जगताप स्मृती भवन' येथे उत्साहात पार पडला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर  युवराज भोसले यांनी केले उपस्थितांचे स्वागत रोहित बोत्रे यांनी केले , प्रास्ताविक ज्ञानेश्वर जगता , मनोगत सुनील भोसले , राजेंद्रबापू जगताप व संदीप जगताप  तर आभार मनोज दिक्षित गुरुजी यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या