अण्णांची प्रकृती ठणठणीत रुटीन चेकअपसाठी रुबी हॉस्पिटलमध्ये...


दत्त्ता गाडगे । तालुका प्रतिनिधी
(पारनेर) : -

ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची तब्येत ठणठणीत असून काळजीचे कोणतेही कारण नाही. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनीधींकडून सातत्याने विचारणा होत असल्याने हि अधिकृत माहिती अण्णांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

आदरणीय अण्णा काल दिवसभर कार्यकर्त्यांच्या शिबिरात होते. त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू आहे. गेले दीड वर्ष कोरोना स्थितीमुळे अण्णांचे रुटीन चेकअप करण्यात आलेले नव्हते. काल डॉ. धनंजय पोटे व डॉ. हेमंत पालवे यांनी प्राथमिक तपासण्या केल्यानंतर वयानुरुप पुढील तपासण्या रुबी हॉलला करण्याची सुचना केली.

त्यानुसार अण्णांना आज विविध तपासण्या करण्यासाठी रुबी हॉल, पुणे येथे आणण्यात आले आहे. झालेल्या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे डॉ. ग्रँट यांनी सांगितले आहे. कोणताही त्रास नसला तरी वयानुरुप प्रिकॉशन म्हणून डॉक्टरांनी एन्जिओग्राफी केली असुन तेही रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या